shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉज मालकास पोलिसांनी केले जेरबंदविनया मेढेकर, पनवेल


शहरात नुकत्याच उघड झालेल्या वासनाकांडात महिलांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवत या व्यवसायात उतरवले जात होते. अनेक वर्ष हा अनैतिक व्यवसाय चालू असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. या वासनाकांडाची व्याप्तीदेखील मोठी आहे.शहरात कामानिमित्त येणा-या गरीब व गरजू मुलींना व महिलांना हेरून त्यांच्यावर पाळत ठेवत आणि कालांतराने त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत आहेत.


रोमी लॉजिंग अँन्ड बोर्डिंग आडवली गाव , मुंब्रा पनवेल रोड , रोहिंजण टोल नाक्याजवळ , ता . पनेवल , जि . रायगड नवी मुंबईया जागी वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुुुप्त माहिती पोलिसांना त्यांच्या खबरी कडून मिळाली. त्यानंतर बनावटी ग्राहक बनून या गुन्हेगारांना पोलीसांनी सापळा रचून जेरबंद केले, सोबतच वेश्या व्यवसाय करणाऱ्या 6 पीडित स्त्रियांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी ग्राहकांकडून मोबादला म्हणुन 2000 / - रुपये घेत होते.


 मुली व  महिला या वासनाकांडाची शिकार झाल्या असून अशा पिडीत युवतींचा पुरावा म्हणुन उपयोग करण्याचा निर्णय पोलीस  अ.मा.वा.प्र.कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांनी घेतला आहे. आरोपी कुमार गौंडा (मँनेजर), तमन्रा गौंडा  (मालक)   यांच्यावर ते चालवित असलेल्या रोमी लॉजिंग अँणड बोर्डिंग  या ठिकाणी पिडीत महिलांन लॉज मध्ये ठेवून त्यांचेकडुन वेश्या व्यवसाय चालवण्याच्या आरोपाखाली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम अंतर्गत तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असुन आरोपींना मा. न्यायालयाने १३/८/२१ पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गुन्हाचा तपास  सपोनी सुधीर वाघ हे करत आहेत.


  



  
close