शेततळ्यात अज्ञातांनी विषारी औषध टाकून सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक- संजय सोनवणेे.
इंदापूर प्रतिनिधी: पळसदेव च्या शेलारपट्टा येथील शेतकरी संजय एकनाथ शेलार यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी बुधवारी (दि.११) भेट घेऊन दिलासा दिला.
संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे संजय सोनवणे यांनी भेटीप्रसंगी सांगितले.
संजय शेलार यांचे शेलार पट्टा भागात शेततळे आहे. या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी त्यांनी रूपचंद जातीचे ३० हजार बीज सोडले होते. मात्र कोणीतरी विषारी औषध टाकल्याने मासे मृत्युमुखी पडले.सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास गेल्यानंतर सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
या भेटीच्या वेळी संजय सोनवणे यांनी शेततळ्याची पाहणी केली तसेच शेतकरी संजय शेलार यांचेशी चर्चा केली व ताबडतोब दुरध्वनीवरुन झालेला प्रकार इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या कानावर घातला व लवकरात लवकर आरोपी शोधुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगीतले.लागेचच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या देखील झालेला प्रकार घातला सांगितला व मत्स्यव्यवसाय विभागाकडून मदत करण्याची विनंती ही यावेळी केली.

