shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या..!!

नगर तालुका पोलिस ठाणे यांची कर्तबगारी..!!

नगर प्रतिनिधी ( शिवा म्हस्के)

नगर तालुक्यातील जखणगावा मध्ये (दि.१६) जुलै रोजी रात्री घरफोडी करण्यात आली होती. त्यावेळी बंद घरातुन चार‌ शेळ्या चोरून नेल्या होत्या. या चोरी बाबतीत नगर तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८९/२०२१ भा.द.वि,क,४५७,३८०, प्रमाणे गुन्हा दाखल होता.यांचा तपास सुरू असतानाच या विषयी गोपनिय माहिती वरून पोलिस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील,नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस पथका सोबत कोंबिंन ऑपरेशन राबवुन नगर तालुक्यातीलच देवळगाव सिध्दी  येथुन सराईत गुन्हेगार हर्षल काळे यास या नगर तालुका पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. जखणगावा येथील शेळी चोरीतील आरोपी अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. या सराईत गुन्हेगारवर नगर तालुका पोलिस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे हि दोन गुन्हे दाखल आहेत. बेलंवडी पोलिस स्टेशन व  दौंड पोलिस स्टेशन येथे प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे.

       

सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या विषयी नगर तालुका पोलिस अधिक तपास करत आहे.

    
या कारवाईत साठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक धनराज जारवाला,साह्याक ‌फौजदार लंबडे, इथापे, पोलिस हेड कॉन्स्टेबल धुमाळ,लगड, सरोदे, पोलिस नाईक योगेश ठाणगे, धर्मराज दहिफळे, पोलिस काॅनस्टेबल  जयदत्त बांगर,शाम घावटे, काळे, नगर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी यांनी हि कामगिरी बजावली आहे.
close