प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: (दि.२०) : करमाळा तालुका शहरात मेन रोड वरील कुंकू गल्ली येथील जुनी शाळा नं. ४ ही वास्तू मोडकळीस आलेली आहे सदर इमारतीच्या समोर वाहतुकीचा रस्ता आहे . तिथे लहान मुलेही खेळत असतात . सदरची इमारत धोकादायक स्वरूपात दिसत आहे .नैसर्गिक कारणामुळे ती पडण्याचा संभव आहे . त्यामुळे जिवीत हानी होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका प्रशासनाने सदर इमारतीवर नोटीस देखील लावलेली आहे .तरी सदर इमारत मालकांनी याबाबत आणखीन कोणतेही पाऊल उचललेले नाही . भविष्यात काही जिवित हानी झाल्यास यास जबाबदार कोण ? असे परिसरातील नागरिक प्रश्न विचारत आहेत .
या इमारतीला नगरपालिकेने धोकेदायक इमारत म्हणून नोटीस लावली आहे .परंतु वस्तुस्थिती पहाता सदर इमारतीची भिंत उतरून घेणे आवश्यक आहे .
तरी संबंधीत विभागाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी नागरिकां मधुन मागणी होत आहे .

