मुळा पाट बंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील मॅडम यांनी केले सहकारी व कर्मचारी सह जंगी स्वागत..!
प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई- संपूर्ण महाराष्ट्राला जलसंधारण, पाणी बचत,पर्यावरण रक्षणाचा व महिला सक्षमीकरणाचा संदेश देत सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण करणारी यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट गावची २१ वर्षीय जलदुत प्रणाली चिकटे ही 24 जिल्हे १०५०० किमीचे अंतर सायकल चालवत आज नगर जिल्ह्यात दाखल झाली असता मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील मॅडम यांनी तिचे स्वागत केले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता प्रकाश अकोलकर, जलमित्र सुखदेव फुलारी, हरियालीचे सुरेश खामकर,प्रा.डॉ.प्रशांत शिंदे व मुळा पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच अहमदनगर जलसाक्षरता समितीचे जलप्रेमी संदिप दरंदले पाटील यांनी पण प्रणाली चिकटे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
अहमदनगर येथे सिंचन भवन येथे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी सायली पाटील मॅडम यांनी प्रणाली चिकटे यांच्या जलदिंडीचे कौतुक करत सत्कार केला.तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरापासुन पाणी बचत करून जलसाक्षरताचा संदेश दयावा असे आवाहन सायली पाटील मॅडम यांनी केले आहे.

