अहमदनगर जिल्हा मध्ये अनेक ठिकाणी पाऊसाचा अहाकार...
अहमदनगर: प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
आमच्या प्रतिनिधीनी घेतला अहमदनगर जिल्हा पाऊसाचा घेतलेला आढावा... !
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाची आशंका हवामान विभागाने वर्तविली होती. त्यातील पहिल्या दोन दिवसांत पाऊस झाल्याने नागरिक निश्चिंत होते. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झाला. डोंगरभागांत पावसाचे प्रमाण अधिक होते.
शेवगाव तालुक्यात जनावरे गेली वाहून : सुमारे 40 कुटुंबांना पाण्याचा वेढा होता.
नगर- कल्याण रस्तावर पुल पाण्यात खाली या ठिकाणी मिनी ट्रॅव्हलर बस अडकली जेसीबी मशीन साह्याने काढण्याचे शर्थीचे प्रयत्न.
नगर तालुक्यातील पिंपळगाव तलाव भरला तसेच आगडगाव ,देवगाव,रतडगाव शिवारात तुफान पाऊस बारदरी चा स्वामी विवेकानंद तलाव तुडुंब भरून वाहत आहे.
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील ठिक ठिकाणी ढग फुटी दृश्यं परस्थिती निर्माण झाली होती. तसेच तिसगाव मध्ये नदीला पूर आला होता.

