प्रतिनिधी : बाबासाहेब तिपोळे
दरेवाडी : दि .31 / नगर तालुक्यातील दरेवाडी येथील वारकरी भवन येथे उमेद अभियान अंतर्गत तसेच बँक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा यांच्या सौजन्याने 28 ऑगस्ट रोजी सामाजिक सुरक्षा मोहीम राबवण्यात आली. या मोहीम अंतर्गत दरेवाडी व नारायणडोहो गावातील महिलांचे PMJJY (330 रुपये) व PMSBY (12 रुपये) असे दोन्ही विम्याचे एकूण 405 फॉर्म गावामध्येच भरले.
या कार्यक्रमसाठी बँक मॅनेजर श्रीम. मिनाक्षी मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वैभव मोहिते प्रभाग समन्वयक दरेवाडी यांनी केले.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन दरेवाडी गावचे उपसरपंच श्री. अनिल करांडे यांनी केले. यावेळी त्यांनी दरेवाडी गावातील ग्रामसंघ यांना ऑफिससाठी रूम देणेबाबत घोषणा केली.
तसेच या गावातील सरपंच स्वातीताई बेरड यांनी गावातील ज्या गरिब कुटुंबातील महिला आहेत त्या महिलांचे दोन्ही विमे स्वतः काढून त्या महिलांच्या सामाजिक सुरक्षाबाबत काळजी घेण्याचे जाहीर केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य आशाताई निंबाळकर यांनी गावामध्ये कार्यरत गटासाठी विविध प्रशिक्षण ग्रामपंचायत स्वनिधीतून देण्याचे जाहिर केले .
यावेळी उपस्थित दरेवाडी गावाच्या सरपंच स्वातीताई बेरड, उपसरपंच अनिल करांडे, ग्रा.पं .सदस्या आशाताई निंबाळकर, उमेद अभियानचे प्रभाग समन्वयक श्री.वैभव मोहिते, समूह संसाधन व्यक्ती प्रियंका बेरड, सुनंदा करांडे, मंजुश्री करांडे, सुवर्णा साठे, तसेच प्रशांत सर , थोरात सर आदी उपस्थित होते .

