shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात सर्वदूर दमदार मूर पाऊस : बळीराजा व जनता सुखावली..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 

चालू वर्षी पेरणीसाठी वेळेवर वरुणराजाचे आगमन झाले होते त्यामुळे  मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणी लागवड केली होती. वेळेवर आणि आवश्यक तेवढा पाऊस झाल्यामुळे  पिके मात्र जोमाने आलेली आहेत. तालुक्यातील इतर पिकाबरोबर सोयाबीन चा पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे,मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती याचा परिणाम सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत होता हलके  राणातील सोयाबीन पिवळे पडू लागले होते.



मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहत होते तर सर्वत्र झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना सोयाबीनचे पीक व इतर पिके बळीराजाचा  पदरात पडणार आहेत. 

 पाऊस उशिरा पडल्यामुळे जे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई विमा कंपनी भरून देईल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.   तरीही झालेल्या पावसामुळे  सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी  सुखावला असल्याचे पहावयास मिळते.

यावर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नव्हती त्यासाठी आणखी मोठ्या पावसाची  आवश्यकता असल्याचे अनुभवी लोक सांगत आहेत.

close