प्रतिनिधी : सिराज शेख
ऊंदरखेल : दि . ३१ / आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील कढाणी साठवण प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे . शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल च्या कमला नदीवर असणारा हा कडाणी प्रकल्प असून यावर शेतकऱ्यांचा जिव आहे. यावरच भविष्य अवलंबून असते.
यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. कढाणी साठवण प्रकल्पाच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पामुळे उंदरखेल, सुलेमान देवळा, हिवरा-पिंपरखेड या परिसरातील पिण्याचे पाणी व शेतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे . दि . ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रकल्पाच्या सांडव्या वरून पाणी पडले. प्रकल्पाच्या खालील गावांमध्ये नदी दुथडी भरून वाहत आहे.
नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. नागरिकांना शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही . या अनपेक्षित झालेल्या पावसाने प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला. पंचक्रोशीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला असून परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले .

