ॲड नितीन राजगुरू यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी : (२१ ऑगस्ट २०२१)ग्रामपंचायत झगडेवाडी यांच्या वत्तीने झगडेवाडी येथील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व असलेले ॲड नितीन लाला राजगुरू यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी तथा राजमंञी दत्ताञय भरणे यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ॲड: नितीन लाला राजगुरू हे अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्त्व असुन त्यांच्या आई वडील यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलमजुरी करून शिक्षण दिले आहे.
त्यांनी वकील क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. ते आज हायकोर्ट मुंबई येथे काम करतात. त्यांनी आतापर्यंत खुप सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. हायकोर्टात त्यांचा नावाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी चे नावलौकिक होण्यामध्ये त्यांचा खुप मोठा वाटा आहे. यामुळेच त्यांचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुलशेट झगडे यांनी ग्रामपंचायत झगडेवाडी यांच्या वत्तीने ॲड. नितीन राजगुरू सह विविध क्षेत्रातील नामवंत असणारे १५ व्यक्तिचां यशोगाथा विजयाची हा सन्मान त्यांना देऊन गौरविण्यात आले.
या वेळी लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे,राज्य मंञी दत्तात्रय भरणे ,,इंदापुर तालुका कार्याध्यक्ष अतुलशेट झगडे,तालुकाअध्यक्षहनुमंत कोकाटे, झगडेवाडी चे सरपंच सौ. रूपालीताई झगडे,उपसरपंच यशोदाबाई राजगुरू,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण झगडे,प्रगतशील शेतकरी विजय झगडे,महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब झगडे,न्हावी गावचे सरपंच बळवंत बोराटे,डाॅ. दादाराम झगडे,संतोष राजगुरू,विष्णु मोरे,अक्षय राजगुरू,देवराज झगडे ,बाळासाहेब राजगुरू,ओंकार झगडे,हनुमंत राजगुरू,सचिन राजगुरू,गणेश राजगुरू,निरज झगडे,राजगुरू तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक एल. के. जगताप व सर्व ग्रामस्थ,युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

