अवैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्या ७ फायबर बोटी, ३ सेक्शन बोटी उद्ध्वस्त.- धन्यकुमार गोडसे, इंदापूर पोलीस निरीक्षक.
इंदापूर महसूल व पोलिस प्रशासन यांच्या वतीने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई.
इंदापूर प्रतिनिधी: (२ ऑगस्ट २०२१)इंदापूर तालुक्यातील धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलिस स्टेशन व अनिल ठोंबरे तहसीलदार इंदापूर यांचे संयुक्त कारवाईने उजनी जलाशयामध्ये यांत्रिकी बोटी द्वारे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकूण ७ फायबर बोटी व ३ सेक्शन बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. सदर कारवाईमध्ये एकूण १ कोटी २० लाख रुपये किमतीच्या वाळू उपसा करणारे यांत्रिकी बोटी उद्ध्वस्त करण्यात आली. जोपर्यंत वाळू चोरी पूर्णपणे थांबणार नाही तोपर्यंत इंदापूर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन संयुक्तरीत्या कायम व सलग कारवाई करीत राहील. अशी माहिती इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.
सदर कारवाईमध्ये धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलिस स्टेशन, अनिल ठोंबरे तहसीलदार इंदापूर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने ,पोलीस शिपाई अर्जुन नरळे अमोल गारुडी, समाधान केसकर सुहास आरणे, अर्जुन भालसिंग पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे , सुनील राऊत ,महसूल विभागाचे तलाठी यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला असून वाळू माफियांवर धडक कारवाई चालू असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

