shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यक्रम नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथे पार पडला..!!

कृषी दूत अभिषेक जामदार यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन..


नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)

लोकनेते बाळासाहेब विखे पाटील प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीचे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक अनुभव कार्यक्रम या साठी  आलेल्या कृषी दूताचे नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. कृषी दूत अभिषेक संदिप जामदार यांनी वडगाव तांदळी येथील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती सांगितली त्यात प्रामुख्याने बि-बियाणे ,खते औषधे ,युरीया ,कोणत्या खतांचा किती वापर कसा करावा औषध फवारणी वेलवर्गीय भाजीपाला मधुन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते हे आवर्जुन सांगितले तसेच यांचे महत्त्व पटवून दिले. कोणते पिक कधी घ्यावे बदलत्या काळानुसार कोणत्याही पिकाकडे वळले पाहिजे.शेती सुपकीता कशी वाढवावी शेती पोषण बनवण्यासाठी मशागत कशी करावी नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापर करून अधिक अधिक पिक कसे काढत येईल यांची थोडक्यात व महत्वाची माहिती दिली. सगळ्यात आधी कोणत्या मालाचे मार्केट कुठे उपलब्ध आहे.कोणत्या मालाला योग्य भाव मिळतो यांचा अभ्यास करूनच  पिक घ्यावे‌ पारंपरिक पिके शेती पध्दतीने उत्पन्न आणि बाजार भाव यात खुप तफावतीमुळे शेती व्यवसाय परवडत नाही. असं एकंदरीत दिसते त्यामुळे फुल शेती भाजीपाला शेती तंत्रज्ञानाने केल्यास शेती परवडेल व नफा हि मिळेल अशी अंत्यंत महत्वाची माहिती दिली.



या वेळी वडगावच्या चे‌ सरपंच सौ.कविता ठोंबरे, उपसंरपच सौ.अश्विनी ‌रणसिंग, शेतकरी सोमनाथ घोंगडे, दत्तात्रय दळवी, अमोल इंगळे,सतिश ठोंबरे,शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षण सहसचिव भारत घोगरे, प्राचार्य निलेश दळे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा.रविद्र विसपुते,प्रा.अमोल खडके, प्रा प्रियंका दिघे, आदि मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

close