shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीज वितरण कंपनी सबूरीनं घ्या.. वीज कनेक्शन तोडणी विरोधात शिर्डीत उपोषण..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी : 

शिर्डी शहरातील अर्थकारण पुर्णतः साईबाबा मंदिरावर अवलंबून आहे. दुस-यांदा साईमंदिर बंद झाल्याने गेल्या दिड वर्षापासून अनेक नागरिक अर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थिति महाराष्ट्र वीज वितरण कंपनी यांच्याकडून शहरातील थकित वीज बिल धारकांचे कनेक्शन तोडले जात आहे. यामुळे श्रीरामनगर भागातील नगरसेवक, नगरसेविका आणि स्थानिक नागरिकांनी म.वि.वि. कंपनीच्या शिर्डी कार्यालया बाहेर जाहिर उपोषण सुरु केले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासुन शिर्डीतील अर्थकारण ठप्प झालेले आहे.सध्या नागरिकांना रोजी रोटीचा प्रश्न आहे. त्यातच हॉटेल व अन्य व्यवसाय बंद आहेत त्यामुळे जगणं मुश्किल झाले असताना म.रा.वि. वि. कंपनी (शिर्डी) वीज बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडत आहे. 




यामुळे आज (दि.2) सकाळपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे. शिर्डी शहराचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मा. नगराध्यक्ष कैलास (बापू) कोते, उपनगराध्यक्ष हरिचंद्र कोंते, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, मा. विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, रविंद्र गोंदकर, मंगेश त्रिभूवन, नगरसेविका छाया शिंदे, अंजली गोंदकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, किरण बो-हाडे, सलिम शेख, जयंती पटेल, रविंद्र विलास कोते, पत्रकार प्रमोद आहेर यांच्या उपस्थितीत उपोषण सुरु झाले आहे. शिर्डी शहराने आज वर सर्वधिक महसूल देण्याचा विक्रम केला असून या अडचणीचा काळात कंपनी ने सहानुभूती ठेवावी. मंदिर उघडल्यावर शिर्डीकर बिल अदा करणारच आहे. तोपर्यंत वीज कनेक्शन तोडू नये अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

close