साळेगाव बस स्टँड प्रकरणी आज सरपंच व ग्रामस्थांचे उपोषण..!!
--------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
साळेगाव ता. केज येथील माथेफिरूने पाडलेल्या बस स्टँडचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे आणि त्या संबंधी मागण्यासाठी आज बुधवारी साळेगावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी व ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी उपोषणार्थीनी गावातील मुख्य रस्त्यावरून वाद्य वाजवून रॅली काढून उपोषणाला सुरुवात केली.
या बाबतची माहिती अशी की, २३ मे रोजी साळेगाव ता. केज येथील बस स्टँड अज्ञान माथेफिरूने पाडले. त्यामुळे प्रवाशांची व महिला, विद्यार्थिनी यांची खूप अडचण होत आहे. याची दखल घेत साळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रजर गौतम बचुटे, ओमप्रकाश मुळे, शिवसेनेचे ज्योतिकांत कळसकर, ज्योतिराम बचुटे, सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे व माजी उपसरपंच श्रीमंत गित्ते, ग्रामपंचायत सदस्य महादेव गायकवाड, पांडुरंग इंगळे, संजय इंगळे, भागवत मुळे, गणेश गालफाडे आणि ग्रामस्थ हे आज दि.२५ ऑगस्ट रोजी साळेगाव येथील शिवाजी चौकातील पाडलेल्या बस स्टँडच्या जागेवर आमरण उपोषण बसले आहेत.
----------------------------------------------------------------------------------
गावातून रॅली काढून केली उपोषणाची सुरुवात ! :-
दरम्यान उपोषणाला बसण्यापूर्वी उपोषणार्थीनी ढोल ताशा वाजवून गावातून रॅली काढली आणि मस्जिद व मंदिराची पूजा करून सर्व गावकऱ्यांचे आशिर्वाद घेत उपोषणाला सुरुवात केली.
------------------------------------------------------------------------------
उपोषणस्थळी अनेकांनी दिली भेट ! :-
उपोषणाला भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,
संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, शहराध्यक्ष भास्कर मस्के, गालफाडे, शाहूराव ठोंबरे यांनी भेट दिली.

