shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नारायण राणे यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

   इंदापूर: दि. २४/  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले होते त्याबद्दल आज इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1 येथील शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार आवाजात नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व नारायण राणे यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.


 त्यावेळी शिवसेना शाखाप्रमुख मा.शामराव लावंड व महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते मा. गोविंदराव पाडुळे यांनी नारायण राणे व भारतीय जनता पक्षाचा निषेध केला.

 यावेळी युवा कार्यकर्ते शिवम गटकुळ,अजय पाडुळे,  अनिकेत पाडुळे ,वैभव गटकुळ, रवींद्र पाडुळे, दीपक पाटील, नाथा कांबळे, महेश कोळेकर ,राजेश जेडगे, नवनाथ पवार व बाल  युवासेना कार्यकर्ते स्वप्निल अनिल पाडुळे उपस्थित होते .
close