प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २४/ नारायण राणे मुर्दाबाद . नारायण राणे करायचं काय खाली मुंडकं वर पाय . अशा गगनभेदी घोषणा देत आज शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांची प्रतिमा गाढवाच्या गळ्यात बांधून या गाढवाची करमाळा शहराच्या प्रमुख रस्त्यावर धिंड काढली .
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की नारायण राणे यांनी विनाकारण शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला असून शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे नारायण राणे हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या भूमिकेला भारतीय जनता पार्टी खतपाणी घालत आहे यापुढील काळात हे प्रकार न थांबल्यास भारतीय जनता पार्टीचे जेथे जेथे कार्यालय असतील ते पेटवून दिले जातील याची दखल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी असा इशारा दिला यावेळी बोलताना युवा समन्वयक शंभूराजे फरतडे म्हणाले की नारायण राणे हे भाजपचे बुजगावणी झाले असून भाजपच्या इशाऱ्यावर हे खेळ करत आहेत इथून पुढे शिवसैनिक गप्प बसणार नसून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय शीलवंत , उपशहर प्रमुख पांडुरंग जाधव ,युवा सेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, शहर प्रमुख सागर गायकवाड ,युवा सेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिनेश घोलप ,लालू सेठ कुरेशी, पंकज परदेशी , संजय भालेराव ,संतोष गांगोटी आदी पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सहकार्य करून चोख बंदोबस्त ठेवला होता . यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे पुतळा फेकून देण्यात आला.

