निषेध नोंदवत नगर पोलिस स्टेशनला नोंदविला गुन्हा
प्रतिनिधी : संजय वायकर
अ.नगर / दि .२५ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा . उद्धवजी ठाकरे यांचे विरोधात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य यावर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात शिवसेना पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे .
आक्रमक सेनेने गांधी मैदान येथील भाजपाच्या
कार्यालयासमोर निदर्शने करत राणेंच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले . तसेच संतप्त शिवसेनेने कोतवाली पोलिस स्टेशन येथे राणेंच्या विरोधात गुन्हाही नोंदविला आहे .
तसेच नगरचे शिवसेनेचे नगरसेवक श्री.गणेश कवडे यांनीही नारायण राणे यांच्या वक्तव्याचा खरपुस समाचार घेत आपला निषेध नोंदवला .

