shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फी माफी वर तात्काळ तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन - आप्पासाहेब ढुस..!!

देवळाली प्रवरा - दि. २४ ऑगस्ट

देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फी भरून घेतल्या शिवाय दाखले मिळत नसल्याने या विषयावर  तात्काळ तोडगा काढला नाही तर   तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंतरराष्ट्रीय खेळाडू  आप्पासाहेब ढुस यांनी दिला आहे.      

     
येथील आय टी विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाकडे चकरा मारीत असून केवळ  आय टी विषयाची फी भरायची बाकी राहिल्याने विद्यालय विद्यार्थ्यांना दाखले देत नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे पालक फी भरू शकत नाही तर दुसरीकडे पुढील शिक्षणाची ऍडमिशन ची मुदत संपत आलेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जानेची भीती निर्माण झाली आहे. 

       
मुलांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झालेने आज आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली येथील आय टी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आय टी विषयाची फी माफ करून पुढील शिक्षणासाठी तात्काळ दाखले मिळावे अशी विनंती करणारे निवेदन शाळेत जाऊन प्राचार्य गुंड सर यांना दिले. 
        
या प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले की जर या विषयावर तात्काळ तोडगा काढला नाही आणि मुलांचे पुढील शैक्षणिक नुकसानझाले तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणेत येईल असा इशारा दिला.
close