नीरा भीमा कारखान्यास आशिष शेलार यांची भेट
इंदापूर:प्रतिनिधी (दि.२४ ऑगस्ट २०२१)
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यास भारतीय जनता पक्षाचे नेते आ.आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि.२४) भेट दिली व कारखान्याची तसेच इथेनॉल उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याची व साखर उद्योगाची आशिष शेलार यांना माहिती दिली. तसेच कारखान्याच्या शहाजी सभागृहामध्ये कारखान्याचे कामकाज, उद्दिष्टे, प्रगती, उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प, भविष्यातील नियोजन यांचे सादरीकरण कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी केले. याप्रसंगी आशिष शेलार यांनी कारखान्याच्या अल्पावधीत झालेल्या कारखान्याच्या प्रगतीचे कौतुक केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळासह आशिष शेलार यांचा सत्कार केला. याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जमादार, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

