प्रतिनिधी । विनया मेढेकर:
पनवेल :-कर्नाळा बँक घोटाळ्याने साठ हजार लोकांचे आयुष्य देशोधडीला लावले.पैसे मिळावे म्हणून लोकांनी बँकेत रोज फेऱ्या मारुन पायाचे तळवे झिजवले.
किती मोर्चे,किती आंदोलन झाले मात्र तरीही महाविकास आघाडी बघ्याचीच भूमिका घेऊन आजपर्यंत ठेवीदारांकडे दुर्लक्ष केले. कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार? असा सवाल किरीट सोमैय्या यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम राहील, असे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले.
विवेक पाटील यांची २३४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे , ही कारवाई ईडीने केली आहे . सहकार कायद्यानुसार ही कारवाई राज्य सरकारने करायला हवी होती . उद्धव ठाकरे घोटाळेबाजांना मदत करण्याचे तर मोदी सरकार घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकण्याचे काम करीत असल्याचे माजी खासदार म्हणाले.
येत्या ९ ० दिवसात म्हणजेच दिवाळीपर्यंत पाच लाखापर्यंतच्या रक्कमा ठेवीदारांना परत मिळतील , असे सोमय्या यांनी सांगून टाकले . आमदार प्रशांत ठाकूर यांनी २८ सप्टेंबर २०१ ९ लढ्याच्या पहिल्या दिवसापासून सोमैय्या यांचा पाठिंब्यात ही मोहीम सुरू केली होती , अशी आठवण करून दिली . रिझर्व्ह बँकेवर मोर्चा , बँकेवर मोर्चा , सीआयडी , पोलीस आयुक्त , सहकार , ईडीचा पाठपुरावा केला . विवेक पाटील यांनी तर छातीठोकपणे घोटाळा झालाच नाही , असा दावा केला होता . मोदी सरकारच्या निर्णयामुळे पाच लक्षपर्यंत सुरक्षा म्हणून पैसे मिळतील , असे आश्वासन दिले . पाच लाखापेक्षा कमी रक्कमेचे ४ ९ हजार ४२३ ठेवीदार आहेत आणि त्यांची एकूण रक्कम २४० कोटी आहे . ती केंद्र सरकारच्या निर्णयानुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून परत मिळेल असा दावा त्यांनी केला .
केंद्राच्या निर्णयाचे क्रेडीट शेकाप घेऊ पाहत आहे , असा आक्षेप प्रशांत ठाकूर यांनी नोंदवला. ऐक ही नेता आघााडी सरकार मधील ठेवीदाराच्या बाजूने कधी उभा राहिला नााही. तपास C I D कडे गेल्यावर फव्त cid कदम ताल करते जागेवरच धावाते, बँकेचे संचालकाना का जुन अटक होत नाहि .....शेकाप पक्षाला हे सरकार मदत करत आहे असे दिसतय अस मत उरण आमदार महेश बादली यांनी मांडल.

