shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयांचा आनंदाचा दिवस - हर्षवर्धन पाटील..

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन हा  प्रत्येक भारतीयांचा आनंदाचा दिवस - हर्षवर्धन पाटील...
इंदापूर :- 
 देशाचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करताना   प्रत्येक भारतवासीयास मनस्वी आनंद होत आहे. 

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन असल्याने हा राष्ट्रीय सण लाखोंच्या उपस्थितीमध्ये  पार पडला  असता  मात्र कोरोणाच्या या संकटातही त्याच  जल्लोषात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातोय.कष्टकरी ,
 शेतकरी ,युवक, शास्त्रज्ञ, सैनिक सर्वच घटकाने देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी योगदान दिले आहे.
 आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर ,या पिढीची जबाबदारी या देशाला अधिकाधिक प्रगतीपथावर ती नेऊन एक प्रगत राष्ट्र निर्माण करण्याचे सामर्थ्य ठेवावे.  
सर्वधर्म समभावाने जातीभेद न मानता आपण फक्त   भारतीय आहोत हे ब्रीद ठेवून बलवान राष्ट्र निर्मिती करण्यासाठी भारतवासीयांनी  या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त संकल्प  करण्याचे  प्रतिपादन राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गौरौद्वागार  काढले. 

 इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील ध्वजवंदन त्यांच्या शुभहस्ते   झाल्यानंतर पाटील    संबोधित करीत होते..
 माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले ,देश स्वतंत्र झाला त्या वेळी 35 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतवासीयांना अन्नधान्याचा तुटवडा भासत होता मात्र सध्या देशाची 135 कोटी लोकसंख्या होऊन देखील केवळ कष्टकऱ्यांच्या ,शेतकऱ्यांच्या जीवावर आपण इतर देशांना अन्नधान्य निर्यात करू शकतो हे गौरवास्पद बाब आहे.  सध्या कोरोना  महामारीमुळे सर्वच क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
  झिका, डेल्टाप्लस  असे विषाणूजन्य आजार पाठ सोडायला तयार नाहीत. त्यामुळे सर्वांनीच  आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.  या अत्यंत भयावह परिस्थितीत  देशातील प्रत्येक डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाची यंत्रणा ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येकाचा जीव वाचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे,  त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.  जपानमध्ये टोकियो  येथे नुकत्याच झालेल्या ऑलंपिक  स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकलेल्या  खेळाडूंचे , विजेत्या    स्पर्धकांचे  अभिनंदन करावे तितके कमी असून  ते  देशासाठी आपली मान उंचावणारे व  कौतुकास  पात्र आहेत.

 देशात कृषी, औद्योगिक, वैद्यकीय, या क्षेत्रात चांगली उन्नती झाली आहे. यामध्ये शेतकरी ,कष्टकरी, भारतीय सैन्यदलातील  जवान यांचे अतिशय मोलाचे कार्य आहे .आपले सैन्यदल अत्यंत ताकदवर असून   जगातील दहा ते अकरा  राष्ट्रांच्या सैन्यदलात गणले जाते.  आपला देश औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात यशस्वी होत असून उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा देखील वाढीस लागल्या आहेत.  प्रत्येक क्षेत्रामध्ये देश प्रगतीपथावर जाताना त्यासाठी असलेले देशाचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत.  देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षितता आबाधित  ठेवण्यात लष्कराने व गृह विभागाने यश संपादित केलेले आहे.  कृषी व सहकार क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांचा सातत्याने पाठपुरावा आहे.  देशापुढे सध्या आर्थिक मंदी पर्यायाने  जागतिक मंदीची आव्हाने आ  वासून उभी आहेत.  पण मात्र या गंभीर परिस्थितीत देखील देश डगमगलेला   नाही .अनेक आव्हानांना निर्भीडपणे सामना करताना दिसत आहे.
या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या भारतवासीयांना हार्दिक अशा शुभेच्छा   त्यांनी दिल्या आहेत.
close