शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील ग्रीन फाउंडेशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणी काळभोर यांच्या संयुक्त विधमानाने तिर्थक्षेत्र रामदरा लोणी काळभोर कोळपे वस्ती येथे ७५ जंगली वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणी काळभोर यांच्या वतीने २००० लिटर पाण्याची टाकी देण्यात येणार आहे. यावेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, आदर्श पत्रकार दिगंबर जोगदंड, युवा सोशल वर्कर महक मधुकर कुमावत, गणेश म्हस्के राज्य विधी विभाग, राहुल कदम-सचिव पुणे जिल्हाविधी विभाग, अनिकेत मुळीक-मनसे हवेली तालुका उपाध्यक्ष(जनहित), विश्वजीत काळभोर- हवेली तालुका उपाध्यक्ष, काका गायकवाड (संघटक)सनी फलटणकर -मनसे उपाध्यक्ष, अमोल काळभोर-लोणी काळभोर शाखाध्यक्ष, संतोष काळभोर, श्रीधर राऊत, वैभव बाचकर, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, जीवन जाधव, निरक बिका उपस्थित होते.
याप्रसंगी गिरिश विभा ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था पुणे, ग्रीन फाऊंडेशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणी, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते. तीर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत त्यांनी परिसरात जंगली झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतली. विविध डोंगर परिसरात अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण तसेच संगोपन करण्यात येणार आहे. ग्रीन फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी वृक्ष संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. यांसाठी पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, यांकरिता पोषक वातावरणाची निर्मिती करणे हे ध्येय समोर ठेवून त्यांनी काम सुरू केले आहे.


