shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येथील जिल्हा परिषदच्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा..!!

नगर प्रतिनिधी( शिवा म्हस्के)

गुंडेगाव (ता.नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळमळा येथे ७५ वा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला, समाजसेवक संजय भापकर ( पत्रकार)  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी शाळा  समितीचे माजी  अध्यक्ष संजय रामदास  कुताळ , शाळेच्या  मुख्याध्यापिका  सांगळे ए.पी. मॅडम, शिक्षका पवार डी.ए ,  क्षीरसागर ए.व्ही , श्रीमती शिंदे. एम.टी  शिक्षकवृंद उपस्थित होते. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, ध्वजगीत, समूहगीत सादर करण्यात आले. शालेय व्यवस्थापन तसेच विविध   समस्या  बद्दल  माहिती  मुख्याध्यापिका ए.पी. सांगळे  यांनी दिली.व  शिक्षका डी.ए पवार  यांनी कोरोनाला न घाबरता सर्वांनी सामना करून कोरोनासह जगण्याची तयारी करावी लागणार आहे. 






शाळा नाही शिक्षण सुरु या उद्देशाने सुरू असलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच शाळा समितीचे माजी  अध्यक्ष संजय कुताळ  यांनी एकतेचे महत्व विशारद केले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन यावेळी करण्यात आले.यावेळी अंगणवाडी सेविका मंदाबाई कुताळ, आशा सेविका कविता कुताळ, प्रिती भापकर, मनिषा कुताळ, समाजसेवक  रामकृष्ण कुताळ, दिलीप कुताळ, शरद कुताळ, नितीन कुताळ, अक्षय कुताळ, बालु कुताळ,  सागर कुताळ, सोमनाथ भिसे अदि ग्रांमस्थ उपस्थितीत होते, सूत्रसंचालन श्रीमती सांगळे मॅडम  यांनी केले.

close