नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील वाळुंज या गावातील ज्ञानदीप विद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सवी ७५ वा स्वातंत्र्यदिन आज उत्साहात पार पडला. संस्थेचे माजी खजिनदार, सह- सचिव , महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग सेवानिवृत्त कर्मचारी बाबू विठोबा जाधव यांच्या शुभहस्ते ज्ञानदीप विद्यालयाचे ध्वजारोहन , जि.प. प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन मार्केट कमेटीचे उपसभापती संतोष म्हस्के यांच्या शुभहस्ते तसेच वाळुंज गावचे विद्यमान सरपंच सुखदेव दरेकर यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण संपन्न झाले.सरपंच सुखदेव दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषक वितरण करण्यात आले.
विद्यालयाकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या सुमारे दीड लक्ष रुपयांच्या कायम ठेवीच्या व्याजातून विद्यार्थ्यांना रोख बक्षीस तथा सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय जैन कॉन्फरसच्या राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड.राजेंद्रजी बलदोटा यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ३७ वर्ष सेवेनंतर शासनाच्या आरोग्य सेवेतून सेवानिवृत झालेले बाबू विठोबा जाधव यांना हि सन्मानीत करण्यात आले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचलीत वाळुंज येथिल रामसत्य कोवीड सेंटरमध्ये रुग्णसेवेचे उत्कृष्ट काम केल्या बद्दल माकेॅट कमीटिचे उपसभापती संतोष म्हस्के यांचाही सन्मान करण्यात आला,
याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी स्व.किसनलालजी संचेती यांच्या स्मरणार्थ एस.एस.सी प्रथम, द्वितीय विद्यार्थ्यांना पारितोषकासाठी सौ. ललिताभाभी राजेंद्र जी बलदोटा यांनी ११००० /रू. कायम ठेव तसेच बाबू विठोबा जाधव यांनी एस.एस.सी.गणित विषयात प्रथम विद्यार्थाला प्रतिवर्षी रोख पारितोषक साठी ५००० /रू. कायम ठेव आणि गरजू निराधार विद्यार्थी कल्याण निधीसाठी ५००० /रू. विद्यालयाकडे प्रदान केले. अशोक बलदोटा यांनीही स्व. कमलाताई बलदोटा यांच्या स्मरणार्थ आपल्या पूर्वीच्या ५००० / रु. कायम ठेव रकमेत आणखी ७००० /रू. ची भर टाकली. कार्यकमास संस्थेचे सचिव रावसाहेब शिंदे, खजिनदार मच्छिंद्रनाथ हिंगे, सहसचिव अरूण हिंगे, संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब दरेकर, शाळा समितीचे अध्यक्ष प्रा. जगन्नाथ हिंगे सर, उपसरपंच अनिल मोरे, ग्रा.प. सदस्य विजय शेळमकर, माजी सरपंच रोहीदास पाडळे, मुरलीधर कर्डिले, राजू हिंगे, माजी चेअरमन नवनाथ हिंगे, माजी सैनिक बाजीराव दरेकर, श्री. प्रदीप नालकूल, ॲड. रोहीतबदोटा, इंजि. राजेंद्र साळुंके साहेब, मनीष शिंगवी सह प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सर्व स्टाफ, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेविका, त्यांचे कर्मचारी, अंगणवाडी, आशा सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.


