shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निर्मलनगर येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी : संजय वायकर

 अ.नगर : (दि .१५) : नगर येथील सावेडी उपनगरातील प्रभाग क्र.२ निर्मलनगर येथे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहन नगरसेवक श्री. निखिल वारे यांच्या हस्ते करून ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 नगरसेवक श्री .निखिल वारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे यांनी देशभक्तीपर भाषण करून सामाजिक संदेश दिला . सामाजिक कार्यकर्ते बंटी हिवाळे आणि डॉ .ताजवे यांनी शुभेच्छा देऊन देशभक्तीपर भाषण केले .

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.लहान मुलांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान केली होती.


कार्यक्रमाला यावेळी संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी, संतोष काळे , डॉ .गोयल,सुशांत भिंगारदिवे, प्रथमेश कोल्हे ,जावेद इनामदार,साजिद इनामदार , प्रथमेश गटणे, सचिन अकोलकर,दिलीप ठाकूर ,अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर , भराट मावशी ,वर्षा गवळी , ज्योती पुरी , सोनाली निमसे, शरयु काळे, सेजल काळे, आहिरे मॅडम ,गहिले मॅडम आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
close