अमरावती - आरोग्यवर्धिनी उपकेंद्र वऱ्हा येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन म्हणजेच आपला राष्ट्रीय सन 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हूणन मा.निलेशजी खुळे साहेब पंचायत समिती सदस्य,तसेच आपल्या कुटुंबाची,जीवाची पर्वा न करता देशसेवा करणारे गावातील माजी सैनिक श्री.वानखेडे साहेब व श्री.मानापुरे साहेब,श्री. रुपेशजी चौधरी स्वच्छग्राही तसेच गावचे प्रथम नागरिक सौ.समरीत मॅडम सरपंच उपस्थित होते.
ध्वजरोहण हे मा.निलेशजी खुळे साहेब पंचायत समिती सदस्य व मा.श्री.वानखेडे साहेब व श्री.मानापुरे साहेब ( माजी सैनिक ) व गावचे प्रथम नागरिक श्रीमती समरीत मॅडम सरपंच यांच्या हस्ते झाले.
माजी सैनिकांनी आपल्या मातृभूमीसाठी केलेली सेवा ही ईश्वरसेवेपेक्षा ही श्रेष्ठ सेवा आहे. त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव म्हूणन त्यांचा सत्कार मा.निलेशजी खुळे साहेब पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.
वरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री.येऊल सर,आरोग्य सहायक श्री. बाबरे सर व गुहाड सर तसेच आरोग्य कर्मचारी श्री.आर.टी. आटोळे,सहायक नर्स मिडवाइफरी श्रीमती.व्ही.कांबळे मॅडम,व मीना मॅडम तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.कु.दीपाली मॅडम व सर्व आशा वर्कर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.टी.आटोळे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

