प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई :-
रक्षाबंधनानिमित सोनई ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगार यांना पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुनिताताई गडाख यांच्या नेतृत्वाखाली सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष दरदले ( चपळे) यांच्या सुनबाई व ग्रामपंचायत सदस्या सौ श्वेताली कृष्णा दरदले यांनी सफाई कामगार महिलांना १६ साड्यांचे वाटप करण्यात आले.
करोना संकटात आरोग्य सभाळुन गावाला स्वच्च्छ ठेवण्याचे काम या महिला करतात त्याचा सन्मान करण्यात आला या वेळीं शंकरराव गडाख पाटील,मित्र मंडळाचे कार्यकर्ते संतोष दरदले व सुनिल तागड यांना महिलांनी राखी बांधून ओक्षण केले या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

