लसूण, भाजीपाला विक्रेते कैलास बाबूलाल खैरनार यांनी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन केली आत्महत्या..!!
न्याहळोद (धुळे) विशाल रायते:-
लसूण, भाजीपाला विक्रेते कैलास बाबूलाल खैरनार (वय ५१) यांनी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळी उघळकीस आली.
न्याहळोद, धुळे कापडणे रस्त्यालगत अंजनाबाई महाजन यांच्या शेताच्या बांधावर भोकराच्या झाडाला गाडी बैलाच्या जोताच्या साह्याने गळ्याला दोर बांधून आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले.
आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. काही दिवसापासून त्यांना आर्थिक विवंचनेची अडचण भासत होती. असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. घटनास्थळी सोनगीर बीट हवलदार विजय पाटील यांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना करून पुढील तपास करीत आहेत.
त्यांची अंत्ययात्रा न्याहळोद येथील पांझरा नदीपात्रात करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे. ते बाबूलाल खैरनार यांचे पुत्र तर ज्ञानेश्वर खैरनार यांचे वडील होत.

