shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंगवेनाईक येथील लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडुन विविध वस्तूंचे वाटप


प्रतिनिधी : आसावरी वायकर

  शिंगवे नाईक : ( दि .४) : नगर तालुक्यातील शिंगवेनाईक येथे जिल्हा परिषद अ.नगर चे उपाध्यक्ष श्री. प्रतापराव शेळके पाटील यांच्या निधीतून आणि सौ.अश्विनी ताई जाधव मा.पंचायत समिती सदस्या,(देहरे गट) ग्रामपंचायत शिंगवे नाईकचे प्रभाग क्र . 3 चे विद्यमान सदस्य श्री.अमोल रमेश डोळस, प्रभाग क्र . 2 चे महेंद्र अरविंद कोळपकर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून,जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या समाज कल्याण विभागकडून वीस टक्के सेस फंड योजनेतून अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप करण्यात आले .


शिलाई मशीन 13, कडबाकुट्टी 01, इलेक्ट्रिकल मोटर 01 तसेच ई साहित्य वाटप करण्यात आले. 


याप्रसंगी मा. सरपंच विश्वासराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते हरीश शेळके, आयाज सय्यद ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रविराज जाधव , ज्ञानेश्वर डोळस, अनिकेत डोळस , राजेंद्र काळे, अमोल शिंदे, कैलास साबळे, भीमा बर्डे, सोना निकम, दिलीप बर्डे, लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close