प्रतिनिधी, मोहन शेगर
सोनई येथील राजवाडा समाज मंदीरात बहुजन समाजाची बैठक संपन्न झाली यात अनेक विषयांवर चर्चा झाली माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांचा मार्गदर्शनाखाली बहुजन समाजाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोन,ईचे माजी सरपंच दादासाहेब वैरागर, रवी भालेराव,हे होते,
यावेळी बहुजन समाजाचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते मुस्लिम समाजाचे, ,नजीरभाई सय्यद,इरफान शेख, सचिन पवार,अतोन साळवे, फारुक शेख, पत्रकार मोहन शेगर, बाबा शिंदे,,विकास फुलारी, अमोल जाधव, करणं शिंदे, कलीम पठाण,आदी बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत बहुजन समाजातील शैक्षणिक दृष्ट्या मागास असून या वर्गाला एकत्र करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल बहुजन समाजाची एकजूट दाखवून उपेक्षित वर्गाला न्याय देणे शक्य होणार आहे बहुजन समाजाचे जेष्ट व युवक कार्यकर्ते यांच्या मार्फत प्रयत्न करण्यात येतील या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बहुजन समाजाचे होतकरू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत करुन, अन्याय आत्याचार झाल्यास बहुजन समाज एकवटला जाईल शिक्षणापासून कुणी ही वंचित राहु नये याची काळजी घेतली जाईल बहुजनांच्या हितासाठी काम करण्यासाठी चर्चा करण्यात आली

