shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्त्रीशक्ती सन्मान व रक्षाबंधनानिमित्त निराधार अपंग व विधवा महिलेची प्रहार कडून भेटवस्तू देऊन सन्मान..!

शिर्डी । प्रतिनिधी :-
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचारप्रेरनेतून "प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका यांच्या नेतृत्वाखाली रक्षाबंधनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध गावांतील अपंग ,विधवा,निराधार तसेच शहीद जवानांच्या "विरपत्नी" या वर्गातील महिला भगिनींना साडी-चोळी व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला आहे.

          
या निमित्ताने तालुक्यातील  निराधार,वृद्ध तसेच दिव्यांग महिलांच्या हस्ते राहाता तालुक्यातील प्रहार पदाधिकाऱ्यांनी औक्षण करून, रक्षाबंधन साजरे केले. तसेच त्यांच्या शासकीय कार्यालयातील प्रलंबित  समस्या जाणून घेत , त्यावर खंबीर उपाययोजना करण्याचे प्रयत्न राहाता तालुका प्रहार टीमने सुरू केले आहेत . 

         
समाजातील असे भरपूर  निराधार घटक आहेत ,  जे आपल्या संस्कृतीत असणारे सण'वार ईच्छा नसून सुद्धा दुःखात साजरे करतात. याच निराधार वर्गांना आधार देण्याचे काम राहाता तालुक्यात प्रहार जोमाने करत आहेत. आज याचं  निराधार वर्गातील महिला भगिनींना एकत्र जमवून त्यांच्या समस्यां जाणून घेत ,  यथायोग्य सन्मान करून  त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे   उद्दिष्ट या  रक्षाबंधनातून प्रहार जनशक्तीने साध्य केले आहे.या सामाजिक कार्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक श्री.अभिजीत कालेकर , राहाता तालुका अध्यक्ष दिनेशराजे  शेळके, दिव्यांग क्रांती तालुका  उपाध्यक्ष नितीन भन्साळी , तालुका संघटक वसंत काळे, समनवयक जगन्नाथ सरोदे , तालुका सल्लागार सेवानिवृत्त  श्री.गुळवे साहेब,मार्गदर्शक मेजर सुनील देशमुख , शुभम गमे , राहाता शहर अध्यक्ष अविनाश सनासे, कार्याध्यक्ष गणेश भुजबळ ,  नांदूरखी खुर्द व बुद्रुकचे शाखा अद्यक्ष विजय वाणी , विशाल दाभाडे , अमोल चौधरी, उपाध्यक्ष  विक्रम दाभाडे ,साकुरी शाखा अध्यक्ष सतीष रोहोम यांनी अमूल्य योगदान दिले आहे.
close