इंदापूरात नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे “जोडा” मारो आंदोलन..
इंदापूर प्रतिनिधी: (२४ ऑगस्ट २०२१) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणे शिवसेना पक्षाच्या वतीने मोर्चे आंदोलने करण्यात आली.
त्याचे पडसाद आज इंदापूर शहरातही ही उमटले असून इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने इंदापूर कचेरी चौकात नारायण राणे यांच्या प्रतिमेला “जोडा” मारो आंदोलन यावेळी करण्यात आले.
यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे,संजय काळे,शहर प्रमुख महादेव सोमवंशी, संदीप चौधरी, ज्ञानदेव चौगुले, अरुण पवार, सुदर्शन रणवरे, युवा सेनेचे किरण गोळे आदी उपस्थित होते.
यावेळी इंदापूर शहर तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलणे बोलणे अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले. राणे यांनी जे वक्तव्य केले ते तमाम महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.यासंदर्भात नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंदे यांनी केली.
यावेळी बोलताना पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे म्हणाले की नारायण राणे यांना भाजप पक्षाने पक्षात घेऊन मंत्रिपद देऊन फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी सोडले आहे.स्व बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना नगरसेवकापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. त्यामुळे नारायण राणे यांनी पूर्वीचे दिवस आठवून तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे बोलायला नको होते असे मत बोन्द्रे यांनी व्यक्त केले.

