हर्षवर्धन पाटील हे अमित शहां बरोबर सहकाराला गती देण्याचं काम करणार ..भाजपाचे प्रवक्ते आशिष शेलार.
इंदापूर प्रतिनिधी: (२४ ऑगस्ट २०२१) केंद्र सरकार पुन्हा सहकार खात्यातल्या मुळ प्रेरणेला गती देण्याच्या विचाराने काम करु पाहत आहे.अमित शहा हे त्याचे नेतृत्व करत आहेत.अनुभवी हर्षवर्धन पाटील या सर्वामध्ये अमित शहां बरोबर या सर्व प्रक्रियेला गती देण्याचं काम करणार आहेत. म्हणून महाराष्ट्राला यातून चांगली संधी मिळणार आहे असा सुतोवाच भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि.२४) रोजी भेट दिली यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, राज्यातील सहकार अपेक्षेप्रमाणे सर्वसमावेशक सर्वांना घेऊन शेतकरी हितासाठी गोरगरीब सामान्य माणसाच्या हितासाठी चाललेल्या चळवळीला भाजपाचे समर्थन आहे.पणं गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः सत्तेत असलेले राज्यातील जे पक्ष आहेत ते मुळ प्रेरणेलाच थड लावताहेत.म्हणून सहकारी कारखाना खाजगी कसा होतो,त्या जमिनी कशा लाटल्या जातात,शेतकऱ्यांचे अजून देणं बाकी कसं राहतं,हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे असे म्हणतं त्यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे आजही नेते आहेत,उद्याही राहतील आणि आजून मोठ्या पदावर जातील असा सुतोवाच केला आहे.

