shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार – आशिष शेलार

सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार – आशिष शेलार 

इंदापूर प्रतिनिधी:(२४ ऑगस्ट २०२१) राज्य सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असून याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारला आणि विशेषतः शिवसेनेला यातून आम्ही गर्भित इशारा देऊ इच्छितो. सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू असा गर्भित इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास आशिष शेलार यांनी मंगळवारी( दि.२४) रोजी भेट दिली यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.


 
या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार,भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद जामदार, संचालक राजवर्धन पाटील,कांतीलाल झगडे,विलासराव वाघमोडे,दत्तात्रय शिर्के,गजानन वाकसे आदी उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने या सर्व प्रकरणात राज्य सरकार वागत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सुद्धा शरमेने आत्महत्या करतील तेवढी झुंडशाही ही महा विकास आघाडीची लोक करत आहेत.नारायण राणे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.मुख्यमंत्री पदाबाबत सर्वांनी सय्यम ठेवायला पाहिजे अशी अपेक्षा बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीची झुंडशाही आम्ही राज्यात पाहतो आहोत,शिवसेनेने हा तमाशा बंद करावा.भाजपाची कार्यालय किंवा भाजपाचे अन्य कार्यालयाच्या ठिकाणी जे तमाशे चालू आहेत ते थांबले नाहीत तर महाराष्ट्रात भारत भारतीय जनता पार्टी तांडव करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारची राहील असंही त्यांनी सूचित केलंय.

मंत्री अनिल परब यांची क्लिप सुद्धा बाहेर आली आहे.त्यामुळे तालिबानी पेक्षाही भयंकर तालीबानी आता ही जमलेली दिसताहेत. मुळात राणे यांनी स्वतः सांगितले आहे की मी कोणता गुन्हा केलेला नाही.याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाच्या म्हणण्यावरुन कोणाचे गुन्हे होणार असतील,आता तुम्ही क्लिप दाखवत आहात आमच्याकडे सीडी आहे हे विसरू नका. या सर्व सीड्या पाहिल्या तर महाविकास आघाडीतील जे मांडीला मांडी लावून बसलेले पक्ष एकमेकांवरती गुन्हे दाखल करतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पाठीत काठी मारीन,उद्धवजींनी जोडे मारीन हे म्हटलं तुम्ही आता सोयीस्कररित्या विसरत आहात याची आठवण शेलार यांनी करुन दिली. केसेस आणि आटका कोणाच्या बोलण्यावरून या पद्धतीने होणार असतील तर त्यापेक्षा गंभीर प्रकारच्या सीड्या आमच्याकडे आहेत असा गर्भित इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.


 
राज्य पूर्ण शांततेत ठेवून कारभार पूर्ण झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. झुंडशाही करायचे असेल,पोलीस बळाचा गैरवापर करायचा असेल,दबावतंत्र वापरायचे असेल तर ते महाराष्ट्र खपून घेणार नाही असंही अशिष शेलार यांनी म्हणालं आहे.
close