shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्र्यांविरोधाततील विधान भोवले ; एरंडोल तालुका शिवसेने तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मागणी....

प्रमोद चौधरी एरंडोल/ जिल्हा प्रतिनिधी
एरंडोल:भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या स्तराचे अपशब्द वापरत अवमान केला.                    त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असून 
राज्यात सर्वत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निषेध नोंदवला जात आहे. वेगवेगळ्या घोषणाबाजी नारायण राणेंच्या विरोधात केल्या जात आहेत.
नारायण राणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यामधील शिवसैनिक आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधातअनेक ठिकाणी गुन्‍हा दाखल करण्यात आले असून एरंडेल शहरात दूपारी शिवसेनेतर्फे धरणगाव चौफुलीवर जोरदार आंदोलन, घोषणाबाजी करीत एरंडोल पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देत राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने, जिल्हा आघाडी महिला प्रमुख महानंदा ताई पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, राजूभाऊ जाधव, तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील,रविभाऊ चौधरी,रमेशआण्णा महाजन,किशोरभाऊ निबांळकर,राजुआबा चौधरी,नानाभाऊ महाजन,प्रसाद दंडवते,गोपाल महाजन,गजानन महाजन,प्रमोद महाजन,महेश महाजन,एकनाथ महाजन,नितीन महाजन,आरिफ मिस्त्री,शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
राज्‍यात नारायण राणे यांच्‍या वक्‍तव्‍याचा तिव्र निषेध नोंदविला जात असून हरेक ठिकाणी शिवसैनिक आक्रमक होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. गुन्हा दाखल करावे असे त्या निवेदनात म्हटले आहे.



 
close