विडा जि.प.गटात खा.डाॅ.प्रितमताई मुंडेंचा झंझावत दौरा,गावोगावी महिलांनी औक्षण करत केले जल्लोषात स्वागत..
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केंद्रीय विकास निधीतून केज-जिवाचीवाडी-चिखलबीड-वडवणी रस्त्यासाठी भरीव निधी देणार आसल्याचे प्रतिपादन बीड जिल्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिवाचीवाडी येथे नागरीकांशी संवाद साधताना केले आहे.
केज तालुक्यातील विडा जि.प.गट हा लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.लोकनेते मुंडे साहेब लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभही विड्यापासून करायचे आणी विडा गटातील जनता नेहमीच साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहात होती.याच विडा जि.प.गटात बीड जिल्याच्या खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी शुक्रवारी झंझावत दौरा केला आसून केज येथे विडा गटाचे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छ भेट देऊण दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला होता.केज-विडा जिल्हा मार्गावर लव्हुरी ग्रामस्थांच्या वतिने भव्यदिव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर येवता येथिल ह.भ.प पांडुरंग इनामदार गुरुजी येवतेकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते,त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गुरुजींना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
पुढे जिवाचीवाडी येथे स्व.लोकनेते गोपिनाथराव मुंडे साहेब चौकात साहेबांना अभिवादन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व जिवाचीवाडी येथिल अखंड हरिनाम सप्ताहास भेट देऊण नागरीकांशी संवाद साधला व तुकुचीवाडी येथिल विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती.खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांचे विडा जि.प.गटात आगमन झाल्यानंतर गावोगावी महिलांकडून ताईंचे औक्षण करून नागरीकांकडून बॅड बाजा पथक,आतिषबाजी करूण जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.त्यामुळे विडा जि.प.गटात स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांच्या निधनानंतरही लोकनेत्या पंकजाताई मुंडे व लोकप्रिय खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी जनतेच्या मनावर आपली छाप कायम ठेवली आसून येथिल जनता लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरणे उभी असल्याचे दिसून आले आहे.
प्रसंगी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,भारतीय जनता पार्टीचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार,वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.वसुदेव नेहरकर,महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष उषाताई मुंडे,केज पंचायत समितीचे सभापती विष्णु घुले,जेष्ठ नेते रमाकांत मुंडे,माजी पंचायत समितीचे सदस्य अशोक चाळक,जिवाच्यावाडीचे सरपंच संजय कुटे,येवत्याचे माजी सरपंच बुवासाहेब पाटील,मच्छिंद्र जोगदंड,वसंत सोनवणे,सयाजी पाटील,बळीराम चाळक,गणेश चाळक,सय्यद महेबूब,आश्रुबा चौरे,बाजीराव चौरे,अंकुश चौरे,श्रीराम कुटे,आनंत चौरे यांच्यासह गावोगावी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


