हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२३,केंद्र शासनाच्या सततच्या गँस दरवाढीमुळे सर्वसामान्य महिलांचे कंबरडे मोडत आहेत तरी सुद्धा केंद्र शासन हे गँसचे दर कमी करण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढवतच आहे या सततच्या गँस दरवाढी विरोधात दि.२३ आँगस्ट सोमवार रोजी सेनगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसिल कार्यालया समोर टाळ-मृदंग वाजवुन निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र शासन गँसची सतत दरवाढ करीत असल्याने केंद्र शासनाचा निषेध करीत टाळ-मृदंग वाजवुन गँस सिलेंडरला हार घालून तिलाजंली देण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा वैशाली वाघ,बेबीताई पोहकर,वाकळे ताई,ज्ञानेश्वर गव्हाणे,गजानन इडोळे सह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

