shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतातून ट्रॅक्टर जाऊ दिले नाही म्हणून विवाहितेवर नराधमाने केला बलात्कार..!!


---------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
शेतातून ट्रॅक्टर जाऊ दिल्या नसल्याच्या रागातून एका विवाहित महिलेच्या घरी कोणी नसताना घरात घुसून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.


या बाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील चिंचपूर शिवारात संदीपान विश्वनाथ चौरे हा पीडित फिर्यादी महिलेच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जात असताना तिने आमच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको; असे म्हणून ट्रॅक्टर अडविले. याचा राग मनात धरून संदीपान चौरे याने दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०० वा. त्या महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पीडित महिलेने विरोध केला असता संदीपान चौरे याने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच दिवशी सकाळी ९:०० वा. त्याचा भाऊ सुखदेव चौरे व वडील विश्वनाथ चौरे यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन संदीपान चौरे याने बलात्कार केल्याची घटना तिच्या दिराला का सांगितली ? असे म्हणून तिला व तिच्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही. असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडित महिलेने दि. २२ ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रभारी ठाणे अमंलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी नराधम संदीपान चौरे, ल सुखदेव चौरे व  विश्वनाथ चौरे यांच्या विरुद्ध गु.र.नं. ४०५/२०२१ भा.दं.वि. ३७६, ३७६ (एफ) (एन), ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी प्रभारी ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक व पिंक पथकाच्या प्रमुख सिमाली कोळी या करीत आहेत.

-------------------------------------------------------
close