shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भेटून दिल्या शुभेच्छा

हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भेटून दिल्या शुभेच्छा 
फोटो:- इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सोमवारी भेटून शुभेच्छा दिल्या.
इंदापूर: प्रतिनिधी (दि.२३ ऑगस्ट २०२१)
            भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना 58 व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांनी दूधगंगा दूध संघ इंदापूर येथे आज सोमवारी (दि.२३) भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 
             हर्षवर्धन पाटील हे वाढदिवशी रविवारी  तालुक्यामध्ये उपस्थित नव्हते. आज ते इंदापूर तालुक्यात आल्यानंतर इंदापूर शहराबरोबरच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, हितचिंतक यांनी हर्षवर्धन पाटील यांना भेटून शुभेच्छा व्यक्त केल्या. या सर्वांच्या शुभेच्छांचा हर्षवर्धन पाटील यांनी आदरपूर्वक स्वीकार केला.
              याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांना बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शिवम दत्तात्रय कदम याने त्यांचे रेखाटलेले अतिशय सुबक व हुबेहूब असे छायाचित्राचे पेंटिंग वाढदिवसानिमित्त भेट दिले. तसेच निमगाव केतकी येथील केतकेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन दादाराव शेंडे यांची पुतणी शिवानी दत्तू शेंडे हिने स्केच त्यांचे केलेले पेंटिंगही हर्षवर्धन पाटील यांनी स्वीकारले. तसेच इंदापूर येथील नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी सोनाक्षी योगेश साळवी हिने हर्षवर्धन पाटील यांना देशाने ऑलम्पिक मध्ये यश मिळविल्याची प्रतिकृतीची इलेक्ट्रिकल राखी रक्षाबंधनानिमित्त भेट दिली. 
          दरम्यान, दूधगंगा दूध संघाने उत्पादन सुरु केलेल्या तूप व पनीरचा विक्रीचा शुभारंभही वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 
____________________________

close