shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदकांच्या स्पर्धेत इंदापूरच्या माधुरी चव्हाण प्रथम..!

सोलापूर :  सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती मा. श्री. विजयराज दादा डोंगरे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त दि. २४/८/२०२१ रोजी राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदकांच्या स्पर्धा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान, शेटफळ येथे भरविण्यात आलेल्या होत्या. सदर स्पर्धेसाठी राज्यभरातून १८ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा २ फे-यात संपन्न झाली. प्रस्तावना व समारोप हे दोन निवेदनातील ठळक मुद्दे होते. व या दोन मुद्दयांवर स्पर्धेचे विषय हे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. 

नाव पुकारल्यानंतर स्पर्धेकाने चिठ्ठी काढुन त्या विषयावर चार मिनिटे निवेदन करायचे होते. दोन फेरीतील ही स्पर्धा चुरशीची झाली. दोन्ही स्पर्धेत इंदापूरच्या अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माधुरीताई चव्हाण यांनी आपल्या हजरजबाबीपणाने प्रथम क्रमांक पटकावला.

निवेदनाची स्पर्धा ही संकल्पना श्री. विजयराज दादा डोंगरे यांच्या कल्पनेतून निर्माण झाली होती व ही महाराष्ट्रातील प्रथम निवेदन स्पर्धा होती. यासाठी परिक्षक म्हणून ह.भ.प. श्री.तुकाराम म्हस्के व प्रा. श्री. ज्ञानेश्वर जाधव यांनी काम पाहिले. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.सी.मांढरे व प्रा.सौ. सुप्रिया खोसे यांनी केले.
close