shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरती जाधव आत्महत्या प्रकरण..! अखेर वडार समाज संघटनेच्या दणक्याने चतुःश्रुंगी पोलीस ठाणे दणाणले..!!


स्व,आरती जाधव आत्महत्याप्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद..!
 आता आरतीच्या मारेक-यांना अटक होणार का?

पुणे :- सासरच्या मंडळींनी दोन मुली झाल्यानंतर मुलगा व्हावा, म्हणून स्व.आरती जाधवचा मानसिक व शाररीक  छळ केल्यानंतर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्यानंतर सासरच्या मंडळींविरोधात संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात होता.या प्रकरणी अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांनी याप्रकरणी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात संघटनेच्या वकीलांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर २५ ऑगस्ट २०२१ रोजी चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात स्वःआरती जाधवच्या मारेक-यांना अटक होणार का? असा संतप्त सवाल वडार समाजातून केला जात आहे.
मयत आरती जाधव

            मुलगा व्हावा, म्हणून स्व,आरती जाधवला  अट्टहास करुन तिला सासरच्या मंडळींकडून ञास दिल्यानंतर ती पालघर जिल्हयातील नालासोपारा येथे माहेरी रहावयास आली होती. परंतु तीची मनधरणी करून तसेच यापुढे तिला ञास दिला जाणार नाही,असे सांगून तिला पुन्हा सासरी पुणे येथे तिचा पती तिला घेवून गेला होता.माञ काही दिवसातच तिच्या पती अमोल जाधवचा ७ जून रोजी फोन आला की, आरती ने आत्महत्या केल्याचे तिच्या घरच्यांना आई वडिलांना सांगितले. माञ आरती आत्महत्या करणार नाही? असे तिच्या आईने सांगितले. तशी चतुश्रूंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस ठाणेही गाठले. माञ पोलीसांनी गुन्हा नोंद केला नाही. याप्रकरणी स्व.आरतीच्या आई मंदा कुशाळकर यांनी पोलीस आयुक्त यांना लिखीत पञ पाठवूनही त्याचा फारसा फरक पोलीसांवर पडला नाही. अखेर या प्रकरणाची दखल तक्रार आल्यानंतर अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांनी गंभीरपणे दखल घेवून मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकरणाला सोशल मिडीयामध्ये वातावरण तापवण्यात आल्यानंतर संतप्त प्रक्रीया उमटल्या, संघटनेच्या वकील टिमने चतुश्रूंगी पोलीस ठाण्यात तपास अधिकारी यांना जाब विचारून आरतीची आत्महत्या नव्हे हत्या झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अखेर २५ ऑगस्ट रोजी भां.द.वि कलम ४९८ ए, ३०६,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा  नोंद केला आहे. 

याप्रकरणी ॲड.वैभव झेंडे,ॲड.नितीन अटपाडकर यांनी कामगिरी पाहिली. 

याप्ररणातील आरोपी पती अमोल, सासरे अशोक जाधव,सासू वंदना जाधव, नणंद कल्याणी जाधव जगताप यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्ररणातील आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांना अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय वडार समाज  संघटनेचे अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांनी केली आहे.
close