(आरोग्य अधिकारी गैरहजर असल्याने प्रभारी डाॅक्टरवर जनतेचा रोष.)
प्रतिनिधी ।मोहन शेगर
सोनई :-सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणावरून कायम गोंधळ व भांडणे होत आहेत.मुख्य आरोग्य अधिकारी गैरहजर राहत असल्याने प्रभारी इनचार्ज असलेल्या आरोग्य अधिकारी यांनाच जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत सविस्तर असे कि सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन लसीकरण सुरू आहे.सध्या आरोग्य विभागाने सोनई ग्रामपंचायत कडे नागरिकांच्या लसीकरणासाठी नोंदणी दिली आहे.सोनई ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या दिवशी हजर राहुन यादी करून नंबर नुसार लस देतात.पण आज दिडशे लसिकरण होते.नागरिकांनी सकाळीच उपस्थित राहुन पाच रूपये देवुन केस पेपर फाडले.
नंबरसाठी दुपार पर्यंत उभे राहिले.दिडशे लस होत्या दिडशेच जणांचा केस पेपर वाटायला पाहिजे होते.पण लसिकरण होवुन केस पेपर घेतलेले पंधराच्यावर नागरिक नंबर लावुन लसिकरणा पासुन वंचित राहिले.यामुळे श्रीरामवाडी येथील काही नागरिक आरोग्य केंद्रावरील कर्मचारी व इनचार्ज डाॅक्टरवर चांगलेच भडकले.यामुळे आरोग्य कर्मचारी सोनई ग्रामपंचायतकडे बोट दाखवायचे तर काही ग्रामपंचायत सदस्य आरोग्य यंञणेकडे बोट दाखवत होते.
यामुळे काही तास सोनई आरोग्य केंद्रावर खुप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यात मुख्य आरोग्य अधिकारी आरोग्य केंद्रात गैरहजर राहत असल्याने नविन इनचार्ज असलेल्या महिला डाॅक्टरांना जनतेच्या रोषाला कायम सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या अक्षरश डोळयात पाणी येते.जनतेच्या प्रश्नाला समाधान कारक उत्तरे देता येत नाही.यात आरोग्य अधिकारी 2 ते 8 तारखे पर्यंत रजेवर गेल्याचे समजले.
नंतर पण ते गैरहजर राहत असल्याने नविन प्रशिक्षणासाठी आलेल्या महिला डाॅक्टर यांच्यावर कामाचा ताण येवुन निर्णय घेता येत नसल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.तसेच डाॅक्टर नसल्याने लसिकरणाच्या आधी रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट पण कालच्या सञात झाल्या नाहीत.तसेच दुपारी लाईट वारंवार जात असल्याने येथे इन्व्हर्टरची व लॅपटाॅपची पण सुविधा उपलब्ध नाही.यामुळे सेशन बंद पडते.लसिकरणासाठी येणारे नागरिकांना व आरोग्य कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्याचे सुदधा नियोजन होत नाही.काही नागरिकांनी सोनई ग्रामपंचायतचे सरपंचाकडे फोनवर संपर्क साधत तक्रारी केल्या.
नोकरदार व शेतकरी वर्ग दिवसभर केसपेपर घेवुन लस मिळत नसल्याने प्रंचड संताप व्यक्त केला.यामुळे सोनई ग्रामपंचायतचे सरपंच यांनी आरोग्य विभागाच्या कामात लक्ष घालुन येथील सावळा गोंधळावर नियंञण ठेवावे अशी मागणी जनतेतुन व्यक्त होत आहे.

