पुणे: शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार व पुणे जिल्हा परिषदेचे वि सदस्य माजी कार्यक्षम सभापती सुजाता अशोक पवार यांनी..
"एक हात मदतीचा" या संकल्पनेतून केलेल्या आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे..
चिपळूण,कोल्हापूर,महाड,रायगड,या पुरग्रस्त बांधवांसाठी गावगावतुन मोठ्या प्रमाणात अन्नधान्यांच्या व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत मिळत आहे..
मिळालेले अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त बांधवां पर्यंत व्यवस्थित रित्या पोहचुन तेथील नागरिकांना वाटप करता आलं पाहिजे.
यासाठी सौ सुजाता अशोक पवार ह्या स्वता जबाबदारीने सहकाऱ्यांच्या मदतीने पॅकिंगचे काम करत आहेत.
व्यवस्थित रित्या पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर या सर्व व जीवनावश्यक वस्तू रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्त बांधवासाठी पोहच केल्या जाणार आहेत.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७

