ऑगस्टक्रांती दिवस
पुलकित करे आशा
स्वतंत्रता संग्रामाला
दिली नव्याने दिशा
भारत छोडोचा नारा
गर्जली करारी भाषा
पेटून उठले निखारे
बदलल्या भाग्य रेषा
नवाकार आंदोलनां
चले जाव जयघोषा
दीड शतकी मग्रुरी
उतरली सत्तेची नशा
करा प्रस्थान तयारी
गुंडाळ आपलागाशा
प्रतिध्वनी परावर्तीत
बापू आपल्या संदेशा
ताकद कुठली शत्रूत
अडवाया याआवेशा
राम वसे मनामनात
वध कराया लंकेशा
स्वातंत्र्य सूर्योदयाची
चाहूल लागे प्रकाशा
स्वातंत्र्य प्रदान देशा
तिरंगा उंच आकाशा
-- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
2)
शिलान्यास ..
ऑगस्ट क्रांती दिन
वाचा जरा इतिहास
काल घडली घटना
वाटतोअसा आभास
त्या वेदना तो त्रास
छेद देई काळजास
बलिदानानं दिधला
भविष्यास नव श्वास
चूड त्यांच्या घरास
उब लाभे आम्हांस
त्यांचा कडकउपास
खातो सुखात घांस
प्रगतीला गती मिळो
बसवला शिलान्यास
उचलू दमदारपाऊल
आता न राहू मागास
देश हाचि अग्रभागी
साधा असा विकास
श्रध्दांजली हीचं खरी
सार्थ ठरावा विश्वास
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com

