खोरोची येथील जळीतग्रस्त नगरे कुटुंबाची ना. भरणे यांनी २५ हजाराचा आर्थिक हातभार देत घेतली भेट.
इंदापूर प्रतिनिधी: (२३ ऑगस्ट २०२१)ना.भरणे यांनी खोरोची च्या नगरे कुटुंबाची भेट घेऊन सदर जळीताची पाहणी केली व या कुटुंबास मदतीचा आर्थिक हातभार म्हणून २५ हजार रुपयेची मदत केली.
तालुक्यातील खोरोची गावातील किसन नगरे यांच्या घराला शाॅर्ट सर्कीटमुळे आग लागली होती.या घटनेत नगरे यांचा संसार जळून खाक झाला होता. भरणे यांनी सोमवारी( दि.२३) रोजी नगरे कुटुंबाची भेट घेतली .विचारपूस करुन नगरे कुटुंबाला यातून सावरण्यासाठी गावाच्या वतीने ४५ हजार रुपये किमतीच्या गृह उपयोगी वस्तू देण्यात आल्या. शिवाय मंत्री भरणे यांनी २५ हजार रुपये रोख स्वरुपात मदत देऊ केली.याशिवाय घरकुल देण्याचा ही शब्द दिला.
यावेळी खोरोची गावातील संजय चव्हाण,संपत सरक, भाऊसाहेब देवकर,दादा भाळे, दत्तात्रय फडतरे,राहुल सरक,दादा हेगडकर,विशाल देवकर,कुमार साठे,राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व ग्रामस्त उपस्थित होते. .

