shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कल्याणी माने या विद्यार्थिनीस शिक्षणासाठी एक लाख रुपये देऊन गौरविले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कल्याणी माने या विद्यार्थिनीस शिक्षणासाठी एक लाख रुपये देऊन गौरविले.
 इंदापूर प्रतिनिधी:(२३ ऑगस्ट २०२१) सुरवड येथील कल्याणी माने या  विद्यार्थिनीने इयत्ता दहावी मध्ये १०० % गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यात प्रथम आल्याने  इंदापूर तालुक्याचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर केले.

 राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी सुरवड येथे  कल्याणी मानेच्या घरी भेट दिली. व तिचा सत्कार करून तिच्या पुढील शिक्षणासाठी रोख रक्कम एक लाख रुपयेची आर्थिक मदतीचा हातभार कल्याणी माने च्या कुटुंबियांना सुपूर्त केली.

कल्याणी माने या विद्यार्थिनीच्या घरातील परस्थिती अतिशय प्रतिकूल असताना ही शिक्षण घेत अभ्यास करून यश संपादन केले व आपल्या कुटुंबियांचे तसेच इंदापूर तालुक्याचे नाव गौरवले. तिचा आदर्श तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मत यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

यावेळी कल्याणीची आई स्वाती माने, राज्यमंत्री भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, हनुमंत कोकाटे, सुरेश शिंदे, दत्तात्रय तोरसकर, बंडू गायकवाड, लक्ष्मण कोरटकर व माने परिवारातील सदस्य उपस्थित होते.
close