shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेळांडूच्या दुखापती व भारत हे अजब समिकरण बनू पाहतंय ..!



                    येत्या बुधवारी म्हणजे ४ ऑगष्ट पासून भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंडविरूध्द पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. भारताचा संघ दोन महिन्यांपासून इंग्लंडमध्ये असल्यामुळे तेथील वातावरणाला चांगल्या पैकी सरावला असणार ? तसं बघाल तर भारताला गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यावरील सामना गमावण्याची सवय लागली आहे. तशी ती परंपरा भारताने या दौऱ्यावर राखली आहे. आपणास ठाऊकच आहे की, भारताने जून महिन्यात साऊथॅम्प्टन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपचा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध गमावला आहे. त्याच सामन्यात भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल जायबंदी झाल्यामुळे त्याला इंग्लंड विरूध्दची संपूर्ण कसोटी मालिका मुकावी लागली.
                   

त्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना २१ दिवसाची सुट्टी मिळाली. मात्र भारतीय खेळाडूंनी सध्या सुसाट भरकटलेल्या कोविड-१९ लाच खुलं आव्हान दिले. विनामास्क, कुठलेही सोशल डिस्टन्स न पाळता बिनधास्त सुट्टी एंजॉय केली. मात्र त्याचं भलं मोठं प्राईज रिषभ पंतला मिळाला. कोविड -१९ ची सुधारीत आवृत्ती डेल्टा व्हेरीएंटच्या जाळ्यात अडकला. त्याच्या सोबत असलेले वृध्दीमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, गोलंदाजी कोच भरत अरूण, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गारानी हे देखील या महाभयंकर विषाणूच्या विळख्यात सापडले होते. त्या सर्वांचे नशिब बलबत्तर म्हणून ते बचावले व संघा सोबत पुन्हा सक्रीय झाले.
                     
या संकटातून सही सलामत सुटलेल्या भारतीय संघाला त्यानंतर मात्र खेळाडूंच्या दुखापतींनी परेशान करायला सुरूवात केली. २० जुलै ते २२ जुलै दरम्यान इंग्लिश कौंटीज सिलेक्टेड इलेव्हन बरोबर झालेल्या सामन्यात भारताचे दोन खेळाडू जखमी होऊन संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी अनफिट ठरल्याने मायदेशी परतले. भारताचा तो सामना जरी इंग्लिश कौंटी संघाविरूध्द झाला असला तरी जखमी झालेले आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघाकडून नव्हे तर कौंटी संघाकडून खेळत होते.आवेशखान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला तर वॉशिंग्टन सुंदर भारताचाच जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झाला.
                        
२ जुलैला भारतीय संघ नॉटिंगहॅम येथे नेटमध्ये सराव करत असताना सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालही जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या उसळत्या चेंडूला व्यवस्थित समजू न शकल्याने डोक्यात चेंडू लागून जखमी झाला. त्यामुळे पहिल्या कसोटीत संघात निश्चितपणे स्थान मिळू शकणारा अग्रवाल किमान पहिल्या कसोटीत तरी आपल्याला तो भारतीय संघात दिसणार नाही. प्रत्यक्षात इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू व्हायची असून या मालिकेत भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या तोफखान्याला सामोरे जाण्यापूर्वीच चार प्रमुख खेळाडू गमवावे लागल्याने संघ प्रबंधनापुढे अडचणी उभ्या राहील्या आहेत. कारण हा दौरा खूप मोठा असून आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर ऐवजी भारतातून इंग्लंडला गेलेले पृथ्वी शॉ व सुर्यकुमार यादव कॉरंटाईनचे नियम पूर्ण झाल्या शिवाय संघात सामील होऊ शकत नाही. मात्र गरज भासल्यास दुसऱ्या कसोटीत त्यांना संधी मिळू शकते. 
                   
नुकताच भारताच्या मर्यादित षटकांच्या चमूने श्रीलंका दौरा केला. वनडे मालिका भारताने जिंकल्या नंतर टि२० मालिकेतही विजयी सुरुवात केली. मात्र कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या आठ प्रमुख खेळाडूंना आयसोलेशनमध्ये जावे लागल्याने उर्वरीत दोन सामन्यात खेळविण्यासाठी अकरा तंदुरूस्त खेळाडू जमा करणे संघ प्रबंधानाला किती त्रासदायक गेले हे आपण बघितलेच आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे भारताला ती मालिका गमवावी लागली. शिवाय यजुवेंद्र चहल व कृष्णाप्पा गौतम यांनाही कोरोना पॉझिटिव्हचा आहेर मिळाल्याने त्यांना इतर खेळाडूंसह मायदेशी परतण्यास विलंब झाला. तर इंग्लंड दौऱ्यासाठी पर्यायी खेळाडू म्हणून निवडलेले पृथ्वी शॉ व सुर्यकुमार यादव विनाकारण श्रीलंकेतच अडकून पडले होते.
                    
आपणास आठवत असेलच भारताने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौरा केला. त्या दौऱ्यात नऊ प्रमुख खेळाडू जखमी झाल्याने भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. सुदैवाने खेळण्याची संधी मिळालेल्या नवोदित खेळाडूंनी सकारात्मक खेळ करत भारताला मालिका विजय मिळवून दिल्याने खेळाडूंच्या दुखापती त्रासदायक ठरल्या नाही. परंतु आता इंग्लंड दौरा आव्हानात्मक असल्याने खेळाडूंच्या दुखापतीचे समिकरण विस्कळीत होण्याची गरज आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close