shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव कोरहाळे येथे आदिवासी कुटूंबियांना खावटी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना धान्याच्या किटचे वितरण..!!


शिर्डी ।  प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
शिर्डी मतदारसंघातील निमगाव कोरहाळे येथे आदिवासी कुटूंबियांना मंजूर झालेल्या खावटी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना धान्याच्या किटचे वितरण जि प माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.कोरोनामुळे राज्यातील आदिवासी समाजबांधवांना आर्थिक हातभार लावावा या दृष्टीने खावटी अनुदान योजनेमार्फत सदर मदत दिली जात असते. 

यामुळे नागरिकांना संकटकाळात मोठा दिलासा मिळत असतो. याप्रसंगी आदिवासी प्रकल्प अधिकारी व समनव्ययक अंबादास बागुल, प स माजी सभापती हिराबाई कातोरे, प स उपसभापती ओमेश जपे, जि प सदस्या पुष्पां रोहम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे, संचालक शरद मते, सरपंच शिल्पा कातोरे, सावळीविहिर च्या सरपंच रुपाली आगलावे, खु चे अशोक जमधडे, श्री गणेश कारखाना संचालक राजेंद्र थोरात, प स सद्स्य काळूराम राजपूत, भाजपचे ओबीसी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर किसान मोर्चे अध्यक्ष बाळासाहेब डांगे, कैलास कातोरे यांच्या सह आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
close