shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यानिकेतन स्कुल व ज्युनियर कॉलेज येथील इ. १०वी व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

विद्यानिकेतन स्कुल व ज्युनियर कॉलेज येथील  इ. १०वी व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान .
इंदापूर:- इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानी विद्या प्रतिष्ठान चे विद्यानिकेतन स्कुल आणी ज्युनियर कॉलेज येथील बुधवार दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी इ. १०वी व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले , उपाध्यक्षा .सौ. चित्रलेखा ढोले, संस्थेचे मुख्य सल्लागार.प्रदीप गुरव, सचिव हर्षवर्धन खाडे , प्रशासक गणेश पवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. 
यामध्ये इ.१०वी मध्ये प्रथम क्रमांक ॠषिकेश  काळे(९५.२०%),, द्वितीय क्रमांक राहुल देवकर(८८. २०%) व तृतीय क्रमाक अनिकेत  वीर(८४.२०%) तसेच इ.१२वी विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमाक वैष्णवी  नागटिळक( ९७.५०%), द्वितीय क्रमाक विभागून सुयश  खाडे(९६. ८३%) व मानसी  देवकर (९६.८३%) , तसेच तृतीय क्रमांक विभागून वैष्णवी  मोहिते(९५.६७%) व सिमरन मुलाणी(९५.६७%) आणि चतुर्थ क्रमांक अंकिता साबळे(९५%). तसेच वाणिज्य शाखेत प्रथम क्रमा क्रमांक ॠतुजा  वाघमोडे(९१ %), द्विती य क्रमांक पूजा  येरळकर(८७.६७%) व तृतीय क्रमाक निळ  राऊत (८१%) या बरोबर महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळविले असून सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आले असून विशेष सन्मान म्हणून सुया  खाडे हा विद्यार्थी पीक विज्ञान या विषयामध्ये २०० पैकी २०० गुण घेऊन राज्यात  प्रथम आला त्याचाही विशेष सन्मान केला. सस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यानी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  शुभेच्छा देताना १२वी नंतर योग्य करियर निवडण्याचा सल्ला दिला. यावेळी उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले , सचिव  हर्षवर्धन खाडे  यानी मार्गदर्शन केले. याचबरोबर प्रशासक गणेश पवार , प्रा. अतुल गुळवे, प्रा.रेखा शेरखाने,
close