shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेशन दुकानदारां विरूद्ध नेवासा तहसिलदारांकडे शिवछावा संघटनेची तक्रार..!!


(नेवासा तालुक्यात कोरोना महामारीत गोरगरीबांना मोफत धान्य वाटपात कसुर)

प्रतिनिधी, मोहन शेगर, सोनई 
सोनई-कोरोना महामारीत केंद्र सरकारचे  गोरगरीबांना येणारे मोफत धान्य वाटप करण्यात कसुर होत असल्याने अनेक गोरगरीब नागरिकांनी याबाबत शिवछावा  शेतकरी संघटनेकडे तक्रारी केल्या.यामुळे गोरगरीब नागरिकांची उपासमार होवु नये म्हणुण शिव छावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिप दरंदले पाटील यांनी नेवासा तालुका तहसिलदार रूपेशकुमार सुराणा यांच्याकडे तक्रार निवेदन दिले.


याबाबत सविस्तर असे कि,मागच्या दोन लाटेत कोरोना महामारीचे खुप मोठे लाॅकडाऊन देशाने अनुभवले आहे.यामुळे अनेकांच्या हाताला काम नसल्याने घरात बसण्याची वेळ आली आहे.याकाळात खुप जणांचे रोजगार गेले अनेकांचे काम बंद झाले.हातावर पोट भरणारे गोर गरीब नागरिकांचे आर्थिक हालाखीने प्रचंड हाल होत आहे.गोरगरीबांचे तर खाण्यापिण्याचे प्रंचड झाले.हाती काम नसल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.यातच महागाईचा आगडोंब झाल्याने सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनी जगावे कि मरावे असा प्रश्न पडला आहे.लाॅकडाऊन काळामध्ये शासनाने नेमलेले अधिकृत स्वस्त धान्य रेशन दुकानदारांना गोर गरीब नागरिकांना मोफत धान्य देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

याबाबत रेशन दुकानदारांना केंद्र सरकारच्या मोफत धान्याचा कोटा मिळत आहे.तर कोरोना महामारीत गोरगरीबाचे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने कुणी उपाशी मरू नये म्हणुण जनतेला मोदी सरकारने मोफत धान्य देण्याचे रेशन दुकानदारांना सांगितले होते.पण नेवासा तालुक्यातील  ग्रामिण भागातील काही रेशन दुकानदार केंद्र सरकारचा येणारा मोफत धान्याचा कोटा वाटत नाही.रेशन धारकांना  उडवाउडवीचे उत्तरे देवुन मोफतचे धान्य,तांदुळ काळया बाजारात विकत असल्याचे दिसत आहे.

या रेशन दुकानदारांच्या दबावामुळे व  मनमानी कारभारा विरोधात कुणी आवाज उठवत नाही.यामुळे कोरोना महामारीमध्ये गोरगरीबांचे उपासमारीने प्रंचड हाल होत आहेत.अशा वाईट परिस्थिती मध्ये कुठला राजकिय व प्रशासकिय वचक सुदधा स्वस्त धान्य दुकानदारावर राहिला नाही.सोनई गावासह नेवासा  तालुक्यातील गावातुन गोर गरीब नागरिकांनी याबाबत शिवछावा शेतकरी संघटनेकडे तक्रारी केल्या.रेशन दुकानदाराच्या विरोधात आवाज उठवा निदान कोरोना महामारीत हाताला काम व रोजगार नसल्याने मोफत धान्याचा कोटा मिळावा अशी मागणी गोरगरीब नागरिकांनी केल्याने शिव छावा शेतकरी संघटनेने याबाबत नेवासा तहसिलदार रूपेशकुमार सुराणा यांना तक्रार निवेदन देवुन गोर गरीबांची कैफियत मांडली.

याबाबत तहसिलदार रूपेशकुमार सुराणा यांनी अतिशय जबाबदार,प्रामाणिक  व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुण नेवासा तालुक्यातील रेशन दुकानदारांना कोरोना महामारीत येणारे मोफत धान्य वाटप करण्याबाबत समज दयावी अशी मागणी केली.यावेळी बोलताना तहसिलदार रूपेशकुमार सुराणा म्हणाले, कोरोना महामारीत जर कुणी रेशन दुकानदार धान्य वाटपात कसुर करताना आढळुन आले तर निश्चित आम्ही याबाबत लक्ष घालुन कडक कारवाई करू असे आश्वासन शिवछावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिप दरंदले पाटील यांना दिले.या गैरकारभारा बाबत शिव छावा शेतकरी संघटना पण लवकरच  नागरिकांच्या सामुहिक स्वरूपात तक्रारी दाखल करणार असल्याचे तहसिलदार सुराणा यांना सांगितले.
close